Preloader
image description

2019 All Rights Reserved By

शुभेच्छा आणि स्वागत आहे

नवरंग र्कियेशन्स

वाग्विलासीनी आणि सर्व कलांची अधिष्ठात्री असलेल्या देवी सरस्वतीचा उपासकाने एकत्र येऊन भगवान श्रीरामचंद्रच्या प्रेरणेने व आशीर्वादाने दिनांक १९ मार्च २००७ रोजी 'नवरंग' क्रिएशन्सची गुडी उभारली.

विविध कलेची उपासना व जोपासना करण्याच्या व रसिकांच्या मनोरंजनात्मक भूख् भागवीण्याच्या एकमेव उद्येशाने काही हौशी वैधकीय मित्रानी एकतरीत येऊन या संस्थेची स्थापना करून या संस्कृतिक क्षेत्रात प्रवेश केला. विविध क्षेत्रात नवोदित आणि प्रतिभावन कलावंताना एक प्रभावी व्यासपीठ मिळवून देण्याचा संस्था सातत्याने प्रयत्न करीत असते. संस्थेतर्फे मागील १२ वर्षांत नावीन्यपूर्ण अनेक दर्जेदार व्यावसायिक व प्रायोगिक नाटय प्रयोग व इतर अनेक दर्जेदार नावीन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांना समाजातील सर्व स्तरांतील प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

याशिवाय वैद्यकीय क्षेत्रातील संबंधीत विविध व्यावसायिक संघटनाकरिता दरवर्षी नवरंग क्रियेशन्स प्रिमीयर लिग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा मागील १० वर्षापासुन सातत्याने आयोजित करण्यात येत आहे. ही स्पर्धा साधारणत: ७ ते ८ दिवस चालते. यामध्ये अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेदिक, होमियापॅथी, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो. मेडिकल रिप्रे. असो. यांसारख्या अनेक वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर संस्था सहभागी होत असतात. अशा प्रकारे संस्था संस्कृतिक व क्रिडा व वैद्यकीय क्षेत्रात आपले योगदान देण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहे. व पुढे देखील सामाजिक वैद्यकीय क्षेत्रात आपले मोलाचे योगदान देण्याचा संस्थेचा मानस आहे.